चोपडा (साथीदारवृत्तसेवा) नंदलाल बाविस्कर यांची चोपडा तालुका पोलिसपाटील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन पदाधिकारी व कार्यकारिणीची निवड घोषित केली आहे.
त्यात वडगाव सीम येथील पोलीसपाटील नंदलाल रावसाहेब बाविस्कर यांची सर्वांमते अध्यक्षपदी बिनविरोध तर उपाध्यक्षपदी पुष्पा सुलताने (पोलीस पाटील बोरअजंती) यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी भागवत दगडू पाटील घाडवेल यांना नियुक्ती देण्यात आली.
पोलिस निरीक्षक श्री महेश टाक यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी पो.पा.संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र सोनवणे (हातेड पोलिस पाटील) यांनी नवीन पदाधिकारी निवडीचा विषय मांडून बैठकीला सुरुवात केली. पोलिसपाटील विटनेर यांनी अनुमोदन दिले. यावेळी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन क्षेत्रात कार्यरत सर्व पोलिस पाटील उपस्थित होते.
