चोपडा( प्रतिनिधी) प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय माउंट आबू शाखा आडगाव येथे महाशिवरात्रि निमित्त ओम शांती केंद्रात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
या निमित्ताने गावात प्रभात फेरी काढण्यात आली. सकाळ सत्रात मुरली व दूरदर्शन संचावर बाबांच्या आठवणी यावेळी माता-भगिनींना दाखवण्यात आल्या.
केंद्राच्या प्रमुख दीदी जयश्री बेन, भाई चंद्रशेखर, भाई शामकांत माळी, माणिकचंद पाटील, मगन पाटील, आदींनी भाग घेतला. दुपारी चार वाजता चोपडा केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी मंगला दीदी, यांच्या मार्गदर्शनाखाली सरिता दीदी ईश्वर भाई, बीके घनश्याम भाई बीके जयश्री बेन यांनी ध्वजारोहण केले.
यावेळी (कवी) रमेश जे. पाटील, मुकेश पाटील ,भास्कर पाटील, हजर होते यावेळी महाप्रसादाचे तसेच ब्रह्मभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते.
