• Sat. Jul 5th, 2025

निर्जंतुकीकरणासाठी होणार मदत
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील अडावद येथील युवा सेना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करण्यासाठी उपयोगी पडणारे कॉम्प्रेसर मशीन ग्रामपंचायतीस आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते भेट दिले.

दि. २९ मे रोजी दुपारी १२ वाजता अडावद ग्रामपंचायत कार्यालयात सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत युवा सेना व शिवसेनेच्या मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच भावना पंढरीनाथ माळी व ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे यांच्याकडे निर्जंतुकीकरणासाठी उपयोगात येणारे कॉम्प्रेसर मशीन देण्यात आले.

या वेळी करोनाच्या संकटावेळी गावाच्या उपयोगी पडणारे साहित्य देऊन शिवसैनिकांनी आदर्श उपक्रम राबविला म्हणून त्यांचे कौतुक होत आहे.

‘सर्वांना प्रेरणादायी उपक्रम’
या उपक्रमामुळे समाजातील दातृत्व भावना उदयास येऊन कठीण प्रसंगास हातभार लावणारे उपक्रम राबविण्याची प्रेरणा या कृतीतून इतरांना मिळेल, असे प्रतिपादन आमदार लताताई सोनवणे यांनी केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्या भारती सचिन महाजन, सविता रामकृष्ण महाजन, अलताफखां पठाण,  मु. ना. पाटील पतसंस्थेचे चेअरमन गुलाबराव पाटील, वडगावचे सरपंच नामदेव पाटील, मंगल इंगळे, महेश गायकवाड, कोमल खांबायत, सचिन महाजन, वासुदेव महाजन, रामकृष्ण महाजन, कालू मिस्तरी, जुनेद खान, अनिल देशमुख, रफीयोद्दीन शेख, जितेंद्रकुमार शिंपी, पी. आर. माळी, ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे, वरिष्ठ लिपिक आनंदा महाजन, लिपिक प्रेमराज पवार आदी उपस्थित होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.