श्री विघ्नहर्त्रेः नम:
*अग्निवास* अग्निवास पृथ्वीवर नाही.
*आहुती* – चंद्र मुखात आहुती.
*युगाब्द*-५१२१
*संवत* -२०७६
*भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२*
*शालिवाहन शके* -१९४२
*संवत्सर* – शार्वरी
*अयन* – उत्तरायण
*सौर ऋतु* ग्रीष्म
*ऋतु* – ग्रीष्म
*मास* – ज्येष्ठ
*पक्ष* – शुक्ल
*तिथी* – पौर्णिमा (२४|४२)
*वार* – शुक्र (भृगु वासरे)
*नक्षत्र* – अनुराधा (१६|४३)
*योग* – सिध्द (२०|१२)
*करण* – विष्टि (१३|५७)
– बव (२४|४२)
*चंद्र राशी* – वृश्चिक
*सूर्य राशी* – वृषभ
*सूर्य नक्षत्र* – रोहिणी (४)
*गुरू राशी* – मकर
*गुरू नक्षत्र* उत्तराषाढा (२)
*सुर्योदय* – ०६|०२
*सुर्यास्त* – १९|१३
*वटपौर्णिमा* बृषभपूजन (कारहुणवी), मन्वादि, कुलधर्म, अन्वाधान, भद्रा १३|५७ पर्यंत.
*शुभ मुहूर्त*
*अभिजित* १२|११ ते १३|०४
*अशुभ वेळ*
*राहूकाळ* १०|५८ ते १२|३७
*दिशा शूल* पश्चिम .
*ताराबळ* अश्विनी, कृत्तिका, मृग, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, उत्तराफाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती .
*चंद्रबळ* वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुम्भ .
*शिवलिखीत चौघडीया*
लाभ ०७|३९ ते ०९|१८
अमृत ०९|१८ ते १०|५८
शुभ १२|३७ ते १४|१७
लाभ २१|५६ ते २३|१७
शुभ २४|३७ ते २५|५८
अमृत २५|५८ ते २७|१८
*छायाकल्प चंद्रग्रहण*
ज्येष्ठ शुध्द १५ शके १९४२ दिनांक ०५|०६|२०२० शुक्रवार यादिवशी छायाकल्प चंद्रग्रहण आहे. भारतातून दिसणार आहे. परंतु छायाकल्प चंद्रग्रहण असल्याने वेधादि कोणतेही नियम पाळू नयेत.
*व्रत वैकल्य वटपौर्णिमा* वटसावित्री हे व्रत तीन दिवसाचे आहे. पौर्णिमा व्रताचा शेवटचा दिवस आहे. वडाखाली ब्रह्मासावित्रीचे पूजन, सौभाग्य वायन (वाण) आणि सत्यवान सावित्री कथा श्रवण व उपोषण ही मुख्य कर्मे आहेत.
छायाकल्प चंद्रग्रहण असले तरी वेधादी नियम पाळायची अवश्यकता नसल्याने प्रत्येक वर्षीप्रमाणे पूजन करावे.
वडाचे झाड जवळ नसेल तर, रांगोळीचे चित्र अथवा वडाच्या झाडाचे चित्र काढून घरीच पूजा करता येते.
*उपासना*
“ॐ श्री ब्रह्मसावित्र्यै नमः। “
“ॐ शुं शुक्राय नमः”
*शुभाशुभ दिन*
प्रतिकूल दिवस आहे.
– ज्योतिष सेवा मनुरकर
पर्जन्य विचार – मृग नक्षत्र वाहन
७ जून २०२० रोजी रविवारी रात्री १२|२८ मिनिटांनी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन पर्जन्यसूचक म्हैस आहे. नक्षत्र प्रवेश वेळी वरुणमंडल योग होत असून मंगळ, गुरु, शनि नीर नाडीत आहेत. ३ जूनच्या शुक्र युतीमुळे या नक्षत्राच्या उत्तरार्धात सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे.
दि. ९ ते १३, १८, १९, २० पाऊस अपेक्षित