• Sat. Jul 5th, 2025

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) – जिल्ह्यात ज्या भागामध्ये कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र (containmement zone) म्हणून घोषित करण्यात आलेले असून जिल्ह्यात असे एकूण 66 क्षेत्र असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.


जिल्ह्यात सर्वाधिक 24 प्रतिबंधितक्षेत्र जळगाव शहर महानगरपालिका हद्दीमध्ये, जळगाव ग्रामीणमध्ये-1, अमळनेर शहरात-10, भुसावळ शहरात-13, धरणगाव शहरात-1, चोपडा तालुक्यात-4, पाचोरा शहरात-9, मुक्ताईनगर तालुक्यात-1, भडगाव तालुक्यात-2, यावल तालुक्यात-1 असे जिल्ह्यात एकूण 66 प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.


जिल्ह्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील तालुकानिहाय प्रतिबंधित क्षेत्र याप्रकारे आहेत.

जळगाव महानगरपालिकाक्षेत्रात- मेहरुण, सालारनगर, जोशीपेठ, समतानगर, समर्थ कॉलनी, नेहरूनगर, पवननगर (सातखोल्या), अक्सानगर, गोपालपुरा, खंडेरावनगर, सिंधीकॉलनी, हायवे दर्शन कॉलनी, शाहूनगर, प्रतापनगर, ओंकार नगर, गुलमोहर महाबळ, जळगाव जि.प श्रीधर नगर, हरिविठ्ठल नगर, श्रीराम नगर, आदर्श नगर, गेंदालाल मिल, गांधी नगर (जिल्हा पेठ), गणेश वाडी नानीबाई हॉस्पिटल जवळ, प्रिपांळा हुडको.
जळगाव ग्रामीण- गोदावरी मेडिकल कॉलेज, बॉईज हॉस्टेल, जळगाव.

अमळनेर शहर व तालुक्यात- मुंगसे, साळीवाडा (अमळनेर), आमलेश्वर नगर, इस्लामपुरा, बोरसे गल्ली, प्रतापमील, तांबेपुरा, पैलाड, नगर पैलाड कार्यालय दुरदर्शन केंद्र, सानेनगर.

भुसावळ शहर आणि तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र- समता नगर, सिंधी कॉलनी, पंचशिल नगर, शांती नगर, महेश नगर, अनसुरल्हा नगर लाल बिल्डींग, भजे गल्ली जाम मोहल्ला, इदगाह खडका, इंदिरा नगर, शनिमंदिर वार्ड, शिवदत्त नगर, खडका गांव, मोतिराम नगर.

भडगाव शहर आणि तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र- निंभोरा, दत्तमढी.

चोपडा शहर आणि तालुक्यात- अडावद, कृषिअळी भाग, मल्हारपुरा, बेलदाररअळी.

मुक्ताईनगर तालुक्यात- मन्यारखेडा.

पाचोरा शहर आणि तालुक्यात- देशमुखवाडी, सिंधी कॉलनी, भीम नगर, आंबेडकर नगर, अतुर्ली, गिरडरोड पाचोरा, दत्त कॉलनी, शिवकॉलनी, समर्थ अशोक नगर.

यावल शहर आणि तालुका- नवदुर्गा हौसिंग सोसायटी, फैजपूर.

धरणगाव तालुका- नवेगाव तेली तलाव.
याप्रकारे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले असून प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने आणि इतर सर्व कार्यालये पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.

या क्षेत्रातील नागरिकांना या क्षेत्रातून बाहेर जाणे व बाहेरच्या व्यक्तींना या क्षेत्रात प्रवेश करणेस सक्त मनाई करण्यात आलेली आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.