आणखी ३६ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनारुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून, शुक्रवारी (५ जून) दुपारी प्राप्त करोना संशयितांच्या अहवालातून ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत.
जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या दिशेने वेगाने वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा ३६ रुग्ण आढळले असून, करोनाग्रस्तांची संख्या ९४५ वर पोहचली आहे. या पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सावदा येथील सर्वाधिक ११, रावेर ६, पाचोरा ७, चाळीसगाव ४, यावल २, फैजपूर ४, एरंडोल १, भडगाव १ रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९४५ झाली असून, आतापर्यंत ११३ करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४२९ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. सध्या ३६५ जणांवर उपचार सुरू असल्याची जिल्हा प्रशासनाने दिली आहे.