• Sat. Jul 5th, 2025

चाळीसगाव तालुक्यातील १ लाख कुटुंबांना रोगप्रतिकारक आर्सेनिक अल्बम – ३० वाटप

आशा वर्कर व भाजपा पदाधिकारी मार्फत प्रत्येक घरोघरी जावून दिली जाणार माहिती
चाळीसगाव – (साठी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव मतदारसंघातील कुटुंबांना एक लाख आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषध  वाटप उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

माजी मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व गावातील आशा वर्कर यांच्यामार्फत घरोघरी औषधी वाटप होणार असून त्याच्या सेवणाची पद्धत, पाळायची पथ्य याची माहिती दिली जाणार आहे.

दि.६ जून शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन पर्वावर जिल्हा परिषदेच्या सायगाव – उंबरखेड गटातील प्रत्येक गावात भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, सरचिटणीस अमोल चव्हाण, युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, जितेंद्र पाटील, चेतन पाटील, सागर सूर्यवंशी, राम पाटील यांनी औषधी पोहोच केली.

आमदार मंगेश चव्हाण यांनी उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांच्या काळात शिवनेरी फाउंडेशन व भाजपा परिवाराच्या माध्यमातून आम्ही गरजूंना वेगवेगळ्या मार्गाने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये स्वत:ची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ही गोष्ट लक्षात घेवूनच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या ‘आर्सेनिक एल्बम-30 C’ या भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या होमिओपॅथिक औषधाचे टप्याटप्याने वाटप करण्यात येणार आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.