• Sat. Jul 5th, 2025

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा व राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१८ मे २०२० रोजी “Opportunities in Banking sector & Placement  Assistance” या विषयावर विद्यार्थ्यांना बँकींग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने ‘एकदिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन वेबिनारचे’ आयोजन करण्यात आलेले होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, डॉ. अलोक मल्होत्रा (Senior Mentor & Head Education Delivery NIIT), श्री. निरंजन मोहिते (Regional Head West & South NIIT), वेबिनार समन्वयक डॉ. के. डी.-गायकवाड उपस्थित होते. या राष्ट्रीय वेबिनार आयोजनासंदर्भात महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या राष्ट्रीय वेबिनारप्रसंगी उदघाटनपर मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात त्यातल्या त्यात लॉकडाऊन च्या काळात युवकांना घरबसल्या बँक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या अनेक संधी तसेच या वेबिनारच्या माध्यमातून युवकांना लॉकडाउनच्या काळात सकारात्मक गोष्टींची ओळख करून देणे  याविषयी माहिती करून देणे ही महत्वपूर्ण बाब आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून बँकिंग क्षेत्रातील संधी या विषयाची ओळख करून देणे ही महाविद्यालयाच्या दृष्टीने कौतुकास्पद गोष्ट आहे. या वेळी डॉ.अलोक मल्होत्रा, श्री. निरंजन मोहिते यांनी विद्यार्थ्यांना झूम अॅपच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात विद्यार्थ्यांना असलेल्या संधींची साध्या सोप्या भाषेत ओळख करून दिली. या राष्ट्रीय वेबिनारमध्ये देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या राष्ट्रीय वेबिनारप्रसंगी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार डॉ. के. डी. गायकवाड यांनी मानले. लॉकडाउनच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी ‘बँकिंग क्षेत्रातील संधी’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करणारे कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पहिले महाविद्यालय आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.