चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरातील सर्व व्यापारी बांधवांना व नागरिकांना चोपडा व्यापारी महामंडळने लॉकडाऊनबाबत एक आवाहन केले आहे. त्यामध्ये आज, दिनांक २३ मे शनिवारपासून चोपडे शहरातील सिनेमा गृह, गेस्ट हाऊस, शॉपिंग मॉल वगळून तसेच काही अटींवर रेस्टॉरंट, नाश्ताच्या व पाणीपुरीच्या गाड्या (फक्त पार्सल सेवा पुरवण्याकरिता) हे सर्व सोडून
सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेच्या दरम्यान सुरू राहतील. या कालावधीत शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी व ग्राहकांनी मास्क लावून व सॅनिटायझरचा उपयोग करून व सुरक्षित अंतरचे पालन करावे, असे आवाहन महामंडळ अध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी केले आहे. तरी सर्वांनी नियमांचे कठोर पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा नगरपालिका व पोलिस प्रशासन यांच्या कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल.
सर्वांनी बाजारपेठेत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच कंटेनमेंट झोन अर्थातच प्रतिबंधात्मक परिसर येथील सर्व दुकाने आवश्यक व अनावश्यक सर्व प्रकारचे दुकाने बंद राहतील, याचीही सर्वांनी नोंद घ्यावी, असेही सचदेव यांनी सांगितले.
चोपड्यात दुकाने ठराविक वेळेतच उघडणार; व्यापारी महामंडळ अध्यक्ष सचदेव यांची माहिती
