चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यालयात गुरुवारी, दि. २८ मे रोजी भाजपतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली. या वेळी प्रखर राष्ट्रवादी, विश्व हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष तथा नगरसेवक गजेंद्र जैसवाल यांच्या हस्ते माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष देविदास पाटील, शहर सरचिटणीस मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, उपाध्यक्ष गोपाल पाटील, प्रवीण चौधरी युवामोर्चा सरचिटणीस रितेश शिंपी, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष हेमंत जोहरी, ओबीसी सेल शहराध्यक्ष सुरेश चौधरी, प्रसिद्धीप्रमुख यशवंत जडे, कार्यालयीन मंत्री मोहित भावे, विशाल भोई, गणेश पाटील, योगेश बडगुजर, अजय भोई, विकी भावसार, राज घोगरे, सागर चौधरी, महेंद्र पाटील, चोपडा तालुका तापी सहकारी सूतगिरणी संचालिका रंजना नेवे, वंदना पाटील, माधुरी अहिरराव, रंजना मराठे आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्वांनी करोनाच्या दृष्टीने सुरक्षित अंतर ठेवून सहभाग घेतला.
