• Mon. Dec 30th, 2024

जळगाव जिल्ह्यात अनखी चौदा करोना बाधित रूग्ण आढळले; रुग्णसंख्या २५७ वर

covid19 testcovid19 test

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ,  जळगाव, पारोळा व चोपडा येथे स्वॅब घेतलेल्या 30 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 16 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चौदा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील चार, भुसावळ येथील दहा रुग्णाचा समावेश आहे. 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 257 इतकी झाली असून त्यापैकी 45 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर तीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.