जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ३३१
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कासोदा एरंडोल, जळगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा, यावल आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ८८ करोना संशयितांचे नमुना तपासणी अहवाल आज दि २० मेस रोजी सायंकाळी प्राप्त झाले आहेत. यापैकी ७५ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून, तेरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील आठ, चोपडा येथील एक, यावल येथील एक तर जळगावातील शिवाजीनगर व इतर परिसरातील तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३३१ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ११० रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहे तर आतापर्यंत ३७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.