करोनाबाधितांची संख्या ११६५ वर पोहोचली
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गेल्या आठवड्याभरात जिल्ह्याची करोनाबाधित संख्या झपाट्याने वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे, जिल्ह्यात मृत्यूदर हा राज्यात सर्वाधिक असल्याने प्रशासनाला उपाययोजना करण्याची गरज आहे. सोमवारी दिवसभरात प्राप्त अहवालांमध्ये ५६ करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये त्यात जळगाव शहर ४, भुसावळ १९, चोपडा ३, धरणगाव ९, यावल ५, जामनेर १३, रावेर १, पारोळा २ असे एकूण ५६ करोनारुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात ८ जून रात्रीपर्यंत एकूण ५५६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यात १२६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४८३ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. दरम्यान, वाढत्या करोना रुग्णांमुळे चोपड्यात पाच दिवस कडकडीत बंद जाहीर करण्यात आला आहे.