जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, जळगाव, एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील स्वॅब घेतलेल्या करोना संशयित व्यक्तीपैकी ३० व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून, त्यापैकी १७ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले, तर १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यानंतर नऊ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त होत आठ तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेत. तर एका व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. पाॅझिटिव्ह आढळलेली व्यक्ती जळगावातील पुरुष आहे. दरम्यान, रात्री उशिरा प्राप्त माहितीनुसार जळगावातील आणखी तीनजण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४४५ इतकी आहे.
जिल्ह्यातील १९५ रुग्ण करोनामुक्त जळगाव जिल्ह्यात रविवार दि. २४ मेपर्यंत १९५ रुग्ण करोनावर मात करून बरे होऊन घरी गेले आहेत, तर ५० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
रविवारी दिवसभरात पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ शहरातील ५, अमळनेर येथील २, जळगाव येथील ७, तर भुसावळ तालुक्यातील तळवेल, एरंडोल व भडगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत प्राप्त अहवालात जळगाव, यावल, भुसावळ, जामनेर, अमळनेर, रावेर, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या १८० करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झालेत. यामध्ये १७७ तपासणी अहवाल निगेटिव्ह आले, तर तीन व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती या जळगावातील सुप्रीम काॅलनी, शिवाजीनगर, संभाजी चौक येथील आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ४४५ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.