जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ९४ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल सोमवार सायंकाळी प्राप्त झाले आहे. यापैकी ७६ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १८ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील दक्षतानगर, शाहूनगर, आर. आर. हायस्कूल परिसर याठिकाणचे ११, साईनगर, भुसावळ येथील ३, भडगाव येथील १, पाचोरा येथील १ व यावल तालुक्यातील कोरपावली येथील २ रुग्णांचा समावेश आहे.यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या २९७ इतकी झाली असून, त्यापैकी ७७ व्यक्ती करोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर ३३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.