• Sun. Jul 6th, 2025

दिनांक २६ मे २०२० मंगळवार दैनिक राशिमंथन

*मेष राशी*
   सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. खेळणे हा जीवनातील महत्वाचा भाग आहे परंतु, खेळण्यात व्यस्त होऊ नका. कुटुंबालाही वेळ द्या.

*वृषभ राशी*
   आपले धन संचित कराल ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या. मित्र आणि जवळचे स्नेही मदतीचा हात पुढे करतील. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा होईल. 

*मिथुन राशी*
    दिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील.   ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. 

*कर्क राशी*
    आरोग्य चांगले राहील. आर्थिक लाभ होतील. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा.  करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरु नका. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. 

*सिंह राशी*
   ध्यानधारणा योगा करून उत्साह चैतन्याचा अनुभव घ्याल. घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल.  आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल.

*कन्या राशी*
   तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे प्राप्त होईल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामाचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल. स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळचा उपयोग तुम्ही आपले छंद पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तके वाचू शकतात किंवा आपले आवडते म्यूजिक ऐकू शकतात. 

*तुळ राशी*
   सकारात्मक गोष्टींसाठी उर्जा वापरून चांगला लाभ घ्यावा. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. तुम्ही सगळ्या समस्या, अडचणी विसरून कुटुंबातील सदस्यांसमवेत आनंदात वेळ घालवाल. होय, तुम्ही ते नशीबवान आहात. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. आज जीवनाच्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकतात.

*वृश्चिक राशी*
   तुमची ऊर्जा टिकून राहील. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. 

*धनु राशी*
   आज तुमच्या आई-वडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी संभाषण देऊ शकतात तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे. पवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील.

*मकर राशी*
    सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील.  कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल.

*कुंभ राशी*
   आज तुम्ही आपल्या कुटुंबासोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणार्‍या समस्या सोडवू शकाल.  दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. 

*मीन राशी*
    ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते. जुने मित्र आधार देतील आणि मदत करतील. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

– ज्योतिष सेवा मनूरकर

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.