• Sun. Jul 6th, 2025

मेष राशी .ध्यानधारणा योगा करून उत्साह मिळवाल. मनासारख्या काही गोष्टी घडतील. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील.


वृषभ राशी .आज सकारात्मक विचाराने स्वतःच्या जबाबदारीवर मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. पुढचा प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल.


मिथुन राशी .

व्यापारात मजबुती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्वाचे पाऊल उचलू शकतात यासाठी तुमचा कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. व्यवस्थित संवाद साधून आणि सहकार्याने जोडीदाराशी संबंध सुधारतील. तुमच्या सहकार्याच्या स्वभावामुळे कामाच्या ठिकाणी अपेक्षित निकाल मिळेल. कंपनीत तुमचे पद महत्त्वाचे ठरेल. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल.


कर्क राशी .आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभाची शक्यता आहे. मित्र कुटुंबिय वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. त्या गोष्टी आठवणे ज्याचे आता तुमच्या जीवनात काहीच महत्व नाही हे तुमच्यासाठी ठीक नाही.


सिंह राशी .

आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, कामामध्ये सातत्य ठेवा. उद्योग व्यसायानिमित्त केलेली गुंतवणुक दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल.


कन्या राशी .आजचा दिवस लाभदायक अाहे. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करण्यास देऊ नका. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. आज तुम्ही प्रकाश झोतात राहाल - आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते.


तुला राशी .

अनावश्यक खर्च टाळा. सकारात्मक विचार करा. प्राणायाम ध्यानधारणा योगासने करून उत्साह मिळवाल. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करण्यास देऊ नका. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल.


वृश्चिक राशी .

आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे. एखाद्या जुन्या मित्राच्या अचानक भेटीमुळे रम्य अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. आपल्या विचारांची स्पष्टता उपयोगी पडेल. त्याचबरोबर भूतकाळातील विचारातील गोंधळ नाहीसा होण्यास मदत होईल.


धनु राशी .ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. तुमची गुणवत्ता दाखविण्याची चांगली संधी तुम्हाला मिळेल. आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्हाला वेळ घालवण्याची इच्छा होईल.


मकर राशी .

आज काही कामे मनाप्रमाणे झाल्याने आनंद होईल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल – कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. कठोर परिश्रम आणि योग्य प्रयत्नांमुळे चांगले फळ आणि पारितोषिक मिळू शकते. आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्या जवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल.


कुंभ राशी .

ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. घरातील लहान-सहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते. इतरांना सहकार्य करण्यात वेळ जाईल. स्वत:साठी काहीच करत नाही असे आढळेल. कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊ शकतात.


मीन राशी .
आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च लागू शकतो. तुमच्या स्वतःच्याच मतावर ठाम न राहता इतरांचे मत समजून घ्या. त्यात आपला फायदा असेल. आजच्या दिवशी केलेल्या परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्या जवळ वेळ आहे तर, त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांशी संपर्क करा, जे काम तुम्ही सुरु करणार आहात.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.