दैनिक राशिमंथन, १० जून २०२० बुधवार
मेष राशी
सकारात्मक विचारावर कामावर उर्जा वापरा. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमच्यापुढे कामाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
वृषभ राशी
उत्साही वातावरण असेल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. आज सुंदर दिवस आहे. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात मतभेद होऊ शकतात.
मिथुन राशी
आरोग्य चांगले राहील. कामातील सातत्याने आर्थिक लाभ होतील. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. कामाच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते आज त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद होईल.
कर्क राशी
आर्थिक स्थिती पाहून आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. आजच्या दिवशी आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता असेल. आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील.
सिंह राशी
योग्य ती विश्रांती घ्या. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होईल. इतरांवर खर्च करणे टाळा. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. ज्या नात्याला तुम्ही महत्व देतात त्यांना वेळ द्या.
कन्या राशी
इतरांना मदत करतांना तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणार्या गोष्टी करा. आजचा दिवस करमणुकीवर दानधर्मावर खर्च करण्याचा असेल, आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. आपल्यासाठी वेळ मिळाला तर तुम्ही या वेळेचा सदुपयोग करा.
तुला राशी
आरोग्य चांगले राहील. उत्साह वाढविण्यासाठी व्यायाम प्राणायाम करा. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. तुम्हाला जेव्हा ही रिकामा वेळ मिळेल तेव्हा अपूर्ण काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे.
वृश्चिक राशी
खर्चावर नियंत्रण ठेवा. आधिपासून असलेल्या वस्तु पाहून नंतर खरेदी करा. आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल.
धनु राशी
व्यायाम करा. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणा-या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते. कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे. गुंतवणुक करतांना विवेक जागृत ठेवा, परताव्याची खात्री करूनच पैसे गुंतवा. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.
मकर राशी
मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होतात, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे, याची तुम्हाला आज जाणीव होईल. अनावश्यक खरेदी सध्या थांबवा. चैनीच्या वस्तूंसाठी खर्च करू नका.
कुंभ राशी
तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही कुठल्याही प्रसंगावर सहजपणे मात कराल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. सकारात्मक विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल.
मीन राशी
उत्साहाने कामात सहभाग नोंदवा. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका. आज तुम्ही ऑफिस मधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. यामुळे मनाला शांती मिळेल.