• Sat. Jul 5th, 2025

दैनिक राशिमंथन ११ जून २०२० गुरुवार

मेष राशी
आर्थिक लाभ होतील. शक्य असेल तर गुप्त माहिती दुसर्‍या कुणाला कळू देऊ नका. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. कुटुंबियांबरोबर आनंदात वेळ घालवाल.

वृषभ राशी
मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका कारण, बऱ्याच वेळा तुम्ही मन मारून आपला किमती वेळ व्यर्थ घालवाल. 

मिथुन राशी
आरोग्य चांगले राहील. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. काही कामे परस्पर होतील त्याचे श्रेय तुम्हाला मिळेल. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांना ही वेळ देणे गरजेचे आहे. 

कर्क राशी
आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक सांभाळा. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. तुमची कलात्कम आणि सर्जनशील क्षमता यामुळे तुम्ही कौतुकाचे धनी व्हाल. 

सिंह राशी
इतरांचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचणी निर्माण करु शकतो. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हे छोटेसे भावप्रदर्शनदेखील त्यांचा उत्साह वाढवू शकते. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम केल्यामुळे हाताखालच्या सहका-यांचे तुम्ही कौतुक कराल.

कन्या राशी
आवश्यक नसेल तर इतरांच्य कामात कमीतकमी हस्तक्षेप करा. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका, कदाचित त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची, सहानुभूतीची गरज असू शकते. आनंददायक घटना घडतील.

तुला राशी
मन मे चंगा तो, कटोतीमे गंगा ! प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवू शकतात, काळजी घ्या.  आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द इतरांना निर्विवाद मान्य होईल. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. एकटे वेळ घालवणे इतके शक्य नाही तरी ही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल.

वृश्चिक राशी
उत्साह वाढविण्यासाठी योग प्राणायाम करा. तुमचा मूड चांगला असेल.  कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल.

धनु राशी
तुम्हा आधिक ऊर्जा मिळेल. आर्थिक प्रश्नांवर मार्ग निघेल. खर्च करण्यापूर्वी गरज समजून घ्या. आपले मत तयार करतांना इतरांना काय सांगायचे आहे तेही समजून घ्या. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात.

मकर राशी
विश्रांती घ्या आणि रात्रीची जागरणे टाळा. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाहीत. आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात.

कुंभ राशी
उधारी परत मिळू शकते. आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल.

मीन राशी
तणावरहित राहण्यासाठी आपण ध्यान धारणा करू शकतात.  अधिकचा खर्च टाळा. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे – म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. आज केलेल्या कामातून भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.