• Sat. Jul 5th, 2025

मेष राशी
घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खर्च होऊ शकतो. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल.

वृषभ राशी
कणखर बना. सकारात्मक विचार करा विनाकारण चिंता करू नका. आजच्या दिवशी काहीही करू नका फक्त अस्तित्वाचा आनंद घ्या आणि कृतज्ञतेने राहा. जास्त पळापळ करू नका. 

मिथुन राशी
काळजी घ्या. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. चांगल्या दिवसांपैकी एक दिवस. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकतात   चांगली झोप चांगल्या आरोग्यासाठी खूप गरजेची आहे. 

कर्क राशी
आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. इतरांच्या सूचनांप्रमाणे काम करणे महत्त्वाचे असणारा दिवस. तुमचा रिकामा वेळ आज मोबाइल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल. 

सिंह राशी
कामामध्ये उत्साही असाल, मन प्रसन्न राहण्यासाठी प्राणायाम योग करा. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. स्वप्नील चिंता सोडून द्या. सकारात्मक विचारांनी कामांना सुरुवात करा. नविन योजना आखतांना त्यातील जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या.

कन्या राशी
आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांना ही वेळ देणे गरजेचे आहे. 

तुळ राशी
यत्न तो देव जाणावा. प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.  जे लोक आत्तापर्यंत कुठल्या कामात व्यस्त होते आज त्यांना आपल्यासाठी वेळ मिळू शकतो. तुमच्या जोडीदाराकडून नाविन्यपूर्ण माहितीमिळाल्यामुळे ज्ञानात भर पडेल, आनंदी व्हाल. 

वृश्चिक राशी
तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल. जोडीदाराशी मनातील विचार स्पष्ट करा. त्यामुळे आपल्या कामाला नवी दिशा मिळेल. 

धनु राशी
आपणास यशप्राप्ती होणार आहे. वास्तववादी राहा आणि मदत करणार्‍या लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे. 

मकर राशी
मन प्रसन्न ठेवा. ध्यानधारणा योगासनाने उत्साह वाढेल. इतरांसाठी आदर्शवत ठरण्यासाठी तुम्ही मेहनत करा. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला आहे. नियोजित कामामध्ये आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. 

कुंभ राशी
आपल्या विश्वासपात्र व्यक्तीचा सल्ला घ्या. त्यामुळे कामामध्ये कुशलतापूर्वक यश संपादन कराल. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. 

मीन राशी
विश्रांती घ्या. क्वचित भेटीगाठी होणार्‍या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. कामांना गती मिळेल.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.