नंदुरबार (साथीदार वृत्तसेवा) : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा वर्षाच्या चिमुकलीसह ६६ वर्षीय वयोवृद्धाने करोनावर मात केली आहे. या दोघांसह एकूण ९ रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.
या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. भोये, डॉ. के. डी. सातपुतेसह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. भोये यांनी रुग्णाना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. कोविड संसर्गमुक्त झालेल्या रुग्णात रजाळे येथील चिमुकलीसह २८ वर्षीय व ५५ वर्षीय महिलांचा तसेच ३१, ३५ आणि ६६ वर्षे वयाच्या पुरुषांचा समावेश आहे. शिंदखेडा तालुक्यातील ३५ वर्षीय पुरुष रुग्ण आणि जिल्हा रुग्णालयातील २ कर्मचारीदेखील संसर्गमुक्त झाले आहेत.
नंदुरबार शहरातील करोनासंसर्ग झालेल्या रुग्णाच्या कुटुंबातील ६७ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३७ झाली आहे.
नंदुरबार जिल्हा आकडेवारी : एकूण पॉझिटिव्ह….३७
संसर्गमुक्त झालेले…२८
मृत्यू…..०३
उपचार घेत असलेले…०६
करोना हा उपचाराअंती या रोग बरा होत असल्याने नागरिकांनी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.