मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील बंधपत्रित ( बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्टर्सनासुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
असा होणार फायदा :
वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार मिळणार.
आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार मिळणार.
इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार मानधन.
इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येईल.