चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री संत जगतगुरु तुकाराम महाराज मराठा समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, एक सप्टेंबर रोजी मराठा सेवा संघाचा ३१ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. याबाबत उपस्थितीचे आवाहन शिवमती भाग्यश्री महेंद्र पाटील तालुका उपाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड आणि शिवश्री एकनाथ गुलाबराव पाटील, तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ यांनी केले आहे.
हा कार्यक्रम मराठा बहुउद्देशीय हॉल, जिजाऊ ऊद्यान संजीवनी नगर येथे होणार आहे. सर्व गृप सदस्य मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व इतर सर्व मराठा सेवा संघ प्रणित कक्षाचे कार्यकर्ते मान्यवर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळी १० वाजता वेळेवर हजर रहावे, अशी विनंती करण्यात आलेली आहे.