• Sat. Jul 5th, 2025

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई - (साथीदार वृत्तसेवा) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज, सोमवारी दि. १८ मे रोजी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांना शपथ दिली.

आज, सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम दिवाकर गोऱ्हे, शशिकांत जयवंतराव शिंदे, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड, प्रविण प्रभाकरराव दटके, गोपिचंद कुंडलिक पडळकर, अमोल रामकृष्ण मिटकरी, राजेश धोंडीराम राठोड यांचा समावेश होता. या वेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृह मंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, कृषी मंत्री दादाजी भुसे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे आदींसह सदस्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.