• Sat. Jul 5th, 2025

मुख्यमंत्र्यांची मुंबईतील घरपोच वृत्तपत्र वितरणासंदर्भात वितरकांशी चर्चा

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा)  लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आपण रेड झोन आणि कंटेनमेंट क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील उर्वरित भागामध्ये आपण काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय- तसेच दुकाने व इतर बाबी सुरु केल्या आहेत. वृत्तपत्रे ही आपली दैनंदिन गरज आहे. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे वृत्तपत्रांची घरोघर वितरण आपण बंद ठेवले असले तरी हे तात्पुरते आहे. यातून आपण परिस्थिती पाहून लवकरच मार्ग काढू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतील वृत्तपत्र वितरकांशी संवाद साधत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना ही आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचे सांगत वृत्तपत्र वितरणावर बंधने आली असली तरी यावर लवकरच मार्ग काढला जाईल असे सांगितले.

यावेळी वितरकांनी देखील मुंबईतील सोसायट्यांमध्ये कोरोना संसर्गामुळे वृत्तपत्र घेण्यास लोकांची तयारी नाही त्यामुळे सुरक्षित अंतर पाळून स्टॉलवर विक्री करीत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आपण काही जीवनावश्यक वस्तू, अन्न पदार्थ यांची घरपोच वितरणास परवानगी दिली असली तरी त्यांना देखील संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे अन्यथा प्रादुर्भाव वाढून आरोग्याला धोका होऊ शकतो.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.