जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) सर्वत्र करोना विषाणूने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा फटका रिक्षाचालकांनाही मोठ्यावप्रमाणावर बसला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अनुषंगाने जिल्हा रिक्षा मालक – चालक संघटनेने किराणा साहित्यासह आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राज्य व केंद्र सरकारकडे आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरील निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनस्तरावर पोहचवून मदतीचे आश्वासन आमदारांकडून देण्यात आले.
करोनाचा कहर वाढत चालला असून, गेल्या तीन महिन्यांपासून लाॅकडाउनचे तंतोतंत पालन करून रिक्षा युनियनने घरातच बसणे पसंत केले. मात्र, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन शासनाने रिक्षाचालकांना दहा हजार रुपये व किराणा साहित्य तातडीने द्यावे, अशी मागणी जळगाव जिल्हा नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनने केली आहे.
याप्रसंगी खा. उन्मेष पाटील, आ. चंदू पटेल, आ. संजय सावकारे, आ. सुरेश भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, आ. स्मिताताई वाघ, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रल्हादभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष प्रमोद वाणी, अस्लम शेख, नईम खाटीक, प्रभाकर तायडे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.