• Wed. Feb 4th, 2026

लासूर येथे श्री श्याम भजन संध्या भक्तिमय वातावरणात संपन्न

लासूर ता.चोपडा (वार्ताहर) श्री श्याम आस्था परिवारातर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेला “एक शाम खाटू वाले के नाम” श्री श्याम भजन संध्या सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

सदर भजन संध्येचे आयोजन गावातील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. श्री खाटू श्याम बाबांच्या भव्य दरबाराच्या दर्शनासाठी लासूर तसेच संपूर्ण चोपडा तालुक्यातून भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.

सुप्रसिद्ध भजन प्रवाहक कृत्तिका मालवीया इटारसी(म.प्र)तसेच ऋत्विक शंखपाल पुणे (महा.) यांनी आपल्या मधुर वाणीतून श्री श्याम भजनांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले.बांकेबिहारी सरकार दरबार सेवा खंडवा (म.प्र) यांच्यावतीने विविध फुलांनी बाबांच्या भव्य दरबार सजविण्यात आला तर मध्यप्रदेशातील सुप्रसिद्ध लखदातार म्युझिकल ग्रुप यांच्या तालासुरात भजनसंध्या सोहळा रंगतदार ठरली.

कार्यक्रमाचे प्रसार माध्यमांवर थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने असंख्य श्री श्याम प्रेमींनी भजनसंध्येच्या आस्वाद घेतला.

कार्यक्रम यशस्वितेसाठी गावातील तरुणाईचे अनमोल सहकार्य लाभले.कार्यक्रमास भाविकांच्या उल्लेखनीय प्रतिसाद पाहता लासूर गावात प्रतिवर्षी श्री श्याम वार्षिकोत्सव आयोजित करण्यास कटिबद्ध राहणार असल्याचे श्री श्याम आस्था परिवारातील सदस्यांनी सांगितले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.