वटपूजनाची विधी, पूजा पद्धती
ज्येष्ठ पौर्णिमेस, आज दि. ५ जूनला शुक्रवारी चंद्रग्रहण असून, हे ग्रहण नेहमीच्या ग्रहणाप्रमाणे नसून छायाकल्प ग्रहण असल्याने या ग्रहणाचे वेध व इतर कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत, त्यामुळे नेहमी प्रमाणे सर्व व्यवहार, पूजा, अर्चा, कुळधर्म कुलाचार करावेत. तसेच यावर्षी करोनामुळे प्रत्यक्ष वडाचे पूजन करणे शक्य होणार नसेल तर वडाचे चित्र काढून घरात वटपूजन करावे. तेव्हा नेहमीप्रमाणे आज, ५ जूनला शुक्रवारी मध्यान्हपर्यंत सुमारे दुपारी १.३० वाजेपर्यंत कोणत्याही वेळी घरी वटपूजन करावे.
वटसावित्री पौर्णिमाचे महत्त्व –
स्त्रियांनी करावयाची पुजा, व्रतवैकल्ये करणे स्त्री जीवनाचे दृष्टीने इष्ट व कल्याण करणारी आहे.
वटपौर्णिमेची पुजा सुरू करणेपूर्वी वडाचे झाडास दोरा गुंडाळण्याची पद्धत आहे ती वस्त्राकरिता म्हणून असावी.
वट पूजा प्रारंभ – उदकोपस्पर्श.
स्त्रियांनी दोन्ही डोळ्याला पाणी लावा. स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावा.
वडाच्या झाडाजवळ विडा सुपारी मांडा.
वस्तू –
ताट, तांब्या, पाणी, पंचामृत, श्रीफल, फुल, हळदकुंकू, गहू, वायन दान, वस्त्र, आंबे, दोरा रिळ, निरांजनी इत्यादी.
स्त्रियांची करावयाचा पूजेचा संकल्प –
देशकालौ संकिर्त्य
विष्णुर्विष्णु र्विष्णु:शुभपुण्यतिथौ
सकल पुराणोक्तफल प्राप्त्यर्थ मम इहजन्मनि अखंड सौभाग्य पुत्रपौत्र धनधान्य आयुरारोग्य
ऐश्वर्याभिवृधद्ध्यर्थं श्री वटमूले ब्राह्मासावित्री प्रीत्यर्थ यथाज्ञानेन यथामीलितोपचारद्रव्यै: ध्यानावाहनादि पूजनमहं करिष्ये ।
आदौनिर्विघ्नता सिद्यर्थ महागणपतिपूजनं कलशपूजनंच करिष्ये ।
गणपति पूजन करावे सुपारी मांडली आहे. कलशपूजन करावे नंतर फुलानी पूजासाहित्यावर व आपल्या अंगावर पाण्याचे प्रोक्षण करावे.
मंत्र –
अपवित्र:पवित्रोवा सर्वावस्थांगतोपिवा यस्मरेत्पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतर: शुची।
वटसावित्री ध्यानचा मंत्र – ब्रह्माणंसहसावित्र्या सावित्रीं सत्यवत् प्रीयाम् । धर्मराजं मुनीद्रंच ध्यायामिच महातरुम् ।
‘वटमूले ब्रह्मासावित्र्यैनम:’ या नाममंत्राने षोडशोपचार पूजन करावे. वडाच्या झाडाची पूजा करावी. त्याच्या मुळास पाणी घालावे त्याला प्रदक्षिणा घालाव्यात व सूत वेष्टन करावे. प्रार्थना करावी.
मंत्र – नमो$व्यक्तस्वरूपाय महाप्रणवरूपिणे । महद्रसोपविष्टाय न्यग्रोधाय नमो$स्तुते
वटसावित्रीची कथा ( पोथी ) किंवा कहाणी वाचावी – श्रवण करावी. ब्राह्मणास वायन दान द्यावे, आरती करावी.
– ज्योतिष सेवा मनूरकर.