येत्या काळात तीन ग्रहणे होणार आहेत , या ३ ग्रहणांमधील केवळ एकच ग्रहण म्हणजे २१ जून २०२० चे सूर्यग्रहण फक्त भारतात दिसणार असून ५ जून व ५ जुलै २०२० ची चंद्रग्रहणे ‘छायाकल्प’ स्वरुपाची असणार आहेत.
छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र बिंबास प्रत्यक्ष ग्रहण न लागता चंद्रबिंब फक्त पृथ्वीच्या अंधुक व अस्पष्ट छायेत प्रवेश करत असते. छायाकल्प ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत असे धर्मशास्रात सांगितले आहे , त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी देखील ५ जून व ५ जुलै २०२० या दिवशी होणाऱ्या छायाकल्प चंद्रग्रहणांचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत. फक्त २१ जून रोजी होणाऱ्या सुर्यग्रहणाचे वेधादि नियम गर्भवतींनी व इतरांनी पालन करावे. ५ जून चे ग्रहण पाळू नये. वटपूजन करता येईल.