भुसावळ (साथीदार वृत्तसेवा) येथील फुलेनगर मधील रहिवासी व चंद्रकांत बढेसर यांच्या पतसंस्थेमधील वसुली अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते शिरीष भागवत अडकमोल यांचे ७ जून २०२० रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई- वडील , पत्नी, दोन मुली , एक मुलगा, जावई, तीन भाऊ असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त पोस्टमास्टर जिजाबाई भागवत अडकमोल यांचे द्वितीय चिरंजीव होत, तर दीपक अडकमोल, राजेश अडकमोल, सुनील अडकमोल यांचे भाऊ होत.
सामाजिक कार्यकर्ते शिरीष अडकमोल यांचे निधन
