चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील बडगुजर पेट्रोलपंप शेजारील चंदागौरी नगर येथील रहिवासी व मूळचे वेळोदे येथील प्रसिद्ध व्यापारी सुगनमल गुलाबचंदजी जैन यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने दि २२ मे रोजी सकाळी ११ वाजता दुःखद निधन झाले. ते वेळोदे येथील ललित क्लॉथ स्टोअरचे संचालक ललित जैन, चोपडा येथील महावीर ट्रेडिंग कंपनीचे संचालक नरेश जैन व आनंद स्वीटचे भूषण जैन यांचे आजोबा होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. साथीदार ऑनलाइनच्या टीमकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली