आमदार मंगेश चव्हाण यांना पात्र उमेदवारांनी दिले निवेदन
चाळीसगाव – (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्रात मागील दोन वर्षांपासून पोलीस भरती झालेली नाही. तसेच महाराष्ट्र पोलीस भरती -२०१८ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड यादी अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. जगभराप्रमाणेच महाराष्ट्रातही करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारची कामगिरी करत असून, २०१८ मधील पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कामावर रुजु करुन घेतल्यास पोलीस प्रशासनावरील ताण कमी होणार असल्याने २०१८ मधील पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कामावर रुजु करुन घ्यावे, अश्या मागणीचे निवेदन चाळीसगाव तालुक्यातील भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांना दिले.
याबाबत तात्काळ संबंधित विभागाचे मंत्री यांना पत्र देणार असून आगामी अधिवेशनात देखील मुद्दा उपस्थित करेल असं आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी उमेदवारांना दिले.
निवेदन देतेवेळी महेंद्र रमेश तनपुरे, महेश जाधव, प्रवीण राठोड, कैलास जाधव, पांडुरंग चव्हाण आदींची उपस्थिती होती.