मेष राशी
दिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून व्यवसाय करत असाल तर आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवतील. जर तुम्ही कुठल्या खेळात प्रभुत्व ठेवतात तर, आजच्या दिवशी तुम्ही खेळ खेळण्याचा आनंद घ्याल.
वृषभ राशी
कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. आज तुम्ही आपला रिकामा वेळ आपल्या सेवेमध्ये घालवण्याची इच्छा ठेवाल. तुमचा जोडीदार तुम्हाला आज आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे.
मिथुन राशी
उत्साही असाल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोधळून जाल.
कर्क राशी
योगा दिनाचे औचित्य साधुन योग ध्यानधारणा यामध्ये रूची वाढवा. आज कुणी घेणेदार तुमच्या दरवाज्यावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार माघू शकतो. अापला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण कराल. मित्रांसोबत थट्टा करतांना आपल्या सीमा ओलांडू नका.
सिंह राशी
आरोग्य चांगले असेल. वडीलधार्यांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काही ही फरक पडणार नाही. एकांतात आनंदी राहाल. स्वप्न-प्राप्तीसाठी स्वप्न पाहणे वाईट गोष्ट नाही.
कन्या राशी
तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करेल. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल.
तुळ राशी
योग ध्यानधारणा करून दिवसाची सुरुवात करा. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका असेल. कुटुंबातील सदस्यांशी जवळिक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. तुमच्या नात्यातल्या तक्रारी आज निघून जातील. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणूकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल.
वृश्चिक राशी
धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मन:शांती मिळवून देतील. कार्यशक्तीला उर्जा आज तुमच्याकडे आहे. उत्साहाने कार्य पूर्ण कराल. तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल.
धनु राशी
दिवसाची सुरवात ध्यान धारणा जपाने करू शकतात. आज आपल्या मनाला काबूत ठेवा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील वातावरण अनुकूल असेल. काही गोष्टी मनासारख्या होणार नाहीत. ईश्वरी चिंतनाने आनंद मिळेल.
मकर राशी
प्राणायाम योगाने योगदिनाची सुरुवात करा. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. तुमचे आवडते संगीत ऐकणे तुम्हाला ताजेपणाचा अनुभव देऊ शकतो. सकारात्मक विचाराने कामांना गती मिळेल.
कुंभ राशी
समर्थ व्यक्तीच्या मार्गदर्शनाने मनाचे समाधान होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. आज तुम्ही फोटोग्राफी करून येणाऱ्या दिवसासाठी काही उत्तम आठवणी एकत्र करू शकतात, आपल्या कॅमेऱ्याचा सदुपयोग करणे विसरू नका.
मीन राशी
योग साधनेने दिवसाची सुरुवात करा. सूर्य ग्रहण पाहतांना योग्य काळजी घ्या. काही शंका निर्माण झाल्यास तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घ्या. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काही ही फरक पडणार नाही. एकांतात आनंदी राहाल. अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम होऊन जाईल, जे अविस्मरणीय असेल.