• Sat. Jul 5th, 2025

*मेष राशी
आपली ताकद ओळखून  जेवढे शक्य तेवढ्याच कामाचे वचन द्या – आणि फक्त अशा लोकांना खुष ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन दमून जाण्याची गरज नाही. पोस्टाच्या माध्यमातून आलेला संदेश संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल.   

*वृषभ राशी
प्रगती साधता येईल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. 

*मिथुन राशी
सकारात्मक विचारसरणी बाळगून आलेल्या परिस्थिला सामना करण्यासाठी स्वत:ला उत्तेजन द्या. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची करण्याची गरज आहे. आज तुमच्याकडे आवडत्या कामासाठी पर्याप्त वेळ असेल.

*कर्क राशी
आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. अाज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील परंतु, आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल. अकर्मण्यता पराजयाचे मूळ आहे. ध्यान व योगाभ्यास करून तुम्ही या मुळाला दूर करू शकतात. 

*सिंह राशी
एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.  तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. घराच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तींना आज आपल्या घरात आठवण त्रास देईल.

*कन्या राशी
सकारात्मक विचार वाढवा. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासणे यासाठी वेळ खर्च कराल. आजच्या दिवशी काळजी करू नका, आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. त्या लोकांसोबत मेळ वाढवू नका ज्यांच्या सोबत तुमची वेळ खराब होऊ शकते.  दिवास्वप्न पाहणे वाईट नाही – या माध्यमातून तुम्ही काही रचनात्मक विचार मिळवू शकतात. 

*तुळ राशी
आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. मनात शांती असेल. मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल. सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असाल. त्यामुळे मनस्वस्थता वाटेल.

*वृश्चिक राशी
इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. नातेवाईकांच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल.  रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकतात. 

*धनु राशी
अनावश्यक ताण घेवू नका. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात या योजना यशस्वी होतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. हा दिवस खूप उत्तम असेल. 

*मकर राशी
उद्योजकता यश मिळवून देईल. वडिलधार्‍यांचे विचार जाणून घ्या. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकतात. तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. कामाचा डोंगर असला तरी सहज कार्यपूर्ती कराल. लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर, कधी एकटे राहून आनंदी राहणे पसंत असते. आपल्यासाठी नक्की वेळ काढू शकाल. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एक उत्तम दिवस असले. 

*कुंभ राशी
योगासने प्राणायाम करणे शारिरीक व मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम असेल.  व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. आर्थिक कामे होतील. मित्र भागिदारांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक ताण घेऊ नका.

*मीन राशी
आर्थिक फायद्याचा दावस आहे. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. नियोजित कामामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी चांगला दिवस आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन व आशिर्वाद मिळतील.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.