• Fri. Jul 4th, 2025

दि . ३० जून २०२० मंगळवार

मेष राशी
अनावश्यक खर्चावर तुमचे नियंत्रण ठेवा. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार्‍या लोकांसोबत जाणे टाळा. मित्र भागिदारांकडून आपले कौतुक होईल. कामावर चांगला दिवस असेल. वरिष्ठ आपल्या कामावर प्रसन्न होतील.

वृषभ राशी
आज आर्थिक व्यवहार करतांना दक्षता बाळगणे गरजेचे आहे, नुकसान होण्याची शक्यता आहे. ऑफिस मध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील.

मिथुन राशी
तुमचा खर्च खूप अधिक होईल. निष्काळजीपणामुळे काही तोटा होण्याची शक्यता आहे, सतर्क राहा. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. तुमच्या जोडीदाराला सरप्राइझ देत राहा.

कर्क राशी
कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकतात फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तुम्ही दुस-यांसाठी बरेच काही कराल. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल.

🚩 ज्योतिष सेवा मनुरकर .🚩

सिंह राशी
तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो जर तुम्ही हा सल्ला अमलात आणला तर, तुम्हाला धन लाभ होईल. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल.

कन्या राशी
महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमच्या द्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होतात.

तुला राशी
आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. मित्र परिवार आणि नातेवाईक तुमच्या अधिक अपेक्षा धरतील. तुम्ही रिकाम्या वेळचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी संवाद करू शकतात.

वृश्चिक राशी
आज तुमचे नातेवाईक तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात. तुमचे प्रयत्न आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे तुमच्या कुटुंबातील लोक तुमचे कौतुक करतील. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल.

धनु राशी
तणावावर तुम्ही मात करू शकाल. आपल्या धनाचा संचय कौशल्याने कराल. आजचा दिवस महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेप होऊ शकतो. मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस.

मकर राशी
सकारात्मक विचार अनुभवी लोकांचे मार्गदर्शन तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल.

कुंभ राशी
आज उत्तम स्फुर्ती राहील. तुमचे स्वास्थ्य चांगले राहील. कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे तुमच्या मनावर दडपण येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा.

मीन राशी
आज नविन काम करणार असाल तर, आपल्या पितातुल्य माणसाकडून सल्ला घ्या. आपल्या कुटुंबियांच्या भावनांचा आदर करा. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.