जिल्ह्यात दिवसभरात ४०३ रुग्ण करोनामुक्त
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज, शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले. त्यात जिल्ह्यातील सर्वाधिक ५९५ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आज ४०३ रुग्ण आज करोनामुक्त झाले असून आतापर्यंत ११,७२८ रुग्ण बरे झाले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७,१३१ इतकी झाली आहे. आज ०९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ६४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण ४,७५६ रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.
शुक्रवारी दि. १४ ऑगस्ट रोजी, पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ८४ (६० RATI), भुसावळ ०६ (०१ RATI), अमळनेर ७१ (०६ RATI), चोपडा ०० (२५ RATI), पाचोरा २२, (०५ RATI), भडगाव ०१ (०५ RATI), धरणगाव ३९ (०१ RATI), यावल ०२ (०४ RATI), एरंडोल २२ (४३ RATI), जामनेर १२ (२३ RATI), जळगाव ग्रामीण १४ (०७ RATI), रावेर ०५ (०२ RATI), पारोळा २५ (२८ RATI), चाळीसगाव ३० (०० RATI), मुक्ताईनगर ०० (४१ RATI), बोदवड ०० (०२ RATI) तसेच दुसर्या जिल्ह्यातील ०२, (०७ RATI) रुग्ण आढळून आले.