भडगावातील बारा, तर भुसावळमधील एकाचा समावेश
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या ४८ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल सोमवारी दि. १८ मे रोजी सकाळी प्राप्त झाले. यापैकी ३५ तपासणी अहवाल निगेटिव्ह आले, तर तेरा तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भडगावचे बारा तर भुसावळ येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. यामुळे आता जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या २७९ एवढी झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात ३३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.