चालत्या गॅस टँकरमध्ये चढून ब्रेक दाबून वाहन थांबवून केली धाडसी कामगिरी
सोलापूर – (साथीदार वृत्तसेवा) सोलापूर विभागातील, महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी येथील पोलीस नाईक संजय विठोबा चौगुले बक्कल नंबर 225 यांनी सावळेश्वर टोळ नाक्यावर वाहतुकीचे कर्तव्य बजावत असताना त्यांना समोरून एक गॅस टँकर वेडा वाकडा येत असताना दिसला. ते पाहून पोलीस नाईक चौगुले यांनी त्याच्या ड्रायव्हर ला थांबण्याचा इशारा केला, परंतु त्यातील ड्रायव्हर हा सीटवर पडलेला दिसल्याने पोलीस नाईक चौगुले यांनी मोठ्या शिताफिने चालू गॅस टँकरवर चढून ड्रायव्हर साईडचा दरवाजा उघडून ब्रेक मारून गॅस टँकर थांबविला. पोलीस नाईक चौगुले यांनी केलेल्या धाडसी कार्यामुळे मोठी अपघाती दुर्घटना टळली आहे.