प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याकडे मागणी
नागपूर (सविता कुलकर्णी) माथेरान येथील मुळचे रायगड जिल्ह्यातील पत्रकार संतोष पवार यांचा कोरोनामुळे वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. पत्रकार संतोष पवार यांना कर्जतवरून नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी अँम्बुलन्समधून घेऊन जात असताना वाटेतच सिलेंडरमधिल आँक्सीजन संपल्याने कर्मचाऱ्यांना दुसरा सिलेंडर लावता न आल्याने संतोष पवार यांना जीव गमवावा लागला.
पत्रकार हे नेहमीच आपला जीव मुठीत धरून बातमी करित असतात. यापूर्वी देखील शासकीय हलगर्जीपणाने लातुरचे पत्रकार गंगाधर सोमवंशी, पुणे येथील पांडुरंग रायकर याच्यासह संतोष पवार यांचा मृत्यु होणं ही सर्वात मोठी दुर्दैवी घटना असल्याची असंतोषजनक बाब दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये आता सर्वाधिक जास्त पत्रकार प्रभावित होऊन मृत्युमुखी होत आहेत. जो न्याय देणारा चौथा स्तंभ महाराष्ट्रातच नव्हे, तर अख्या भारतात मानला जातो. दुस-यांना नेहमीच न्याय देतो. त्याच्याच वाटेला न्याय देताना महाराष्ट्र सरकार टाईमपास का करित आहे..? बाधित पत्रकारांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केल्याप्रमाणे ५० लाख रुपयांची मदत द्यावी. जेणेकरुन यापुढे कोणत्याही पत्रकाराचा बळी जाणार नाही. याची दक्षता महाराष्ट्र राज्य सरकार व आरोग्य विभागाने याची जवाबदारी घ्यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश भोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, राज्य महिला अध्यक्षा सुजाता गुरव, राज्य महिला कार्याध्यक्षा सविता कुलकर्णी इ.या निवेदनात सह्या आहेत. संतोष पवार यांच्या मृत्ची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी. तसेच त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत द्यावी. अशी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याकडे या निवेदनाद्वारे
केली आहे.