चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्य तेली महासंघ जळगाव जिल्हा या संस्थेतर्फे जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे. दि. 29 ऑगस्ट 20 21 रोजी स. 10:30 वा. लेवा हॉल सरदार वल्लभभाई पटेल हॉल, टेलिफोन कार्यालयाजवळ जळगाव येथे तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तजी क्षीरसागर, प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष विजयभाऊ चौधरी आणि समाजाचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यासाठी दहावी व बारावीच्या परीक्षेत ७५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे, पदवी व पदविकासाठी ६५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे, डॉक्टर, वकील, सीए या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकाची कॉपी आपल्या तालुक्यातील पदाधिकारी यांच्याकडे जमा करावे किंवा जळगाव येथे साई हॉटेल स्टेशन रोड रेल्वे स्टेशनजवळ यांच्याकडे जमा करावे.
गुणपत्रके दिनांक 25 ऑगस्ट 2021 पर्यंत जमा करायचे आवाहन जिल्हाध्यक्ष के. डी. चौधरी, महिला जिल्हाअध्यक्ष निर्मलाताई रामचंद्र चौधरी, जिल्हा युवक अध्यक्ष सुनील चौधरी, जिल्हा युवक अध्यक्ष सूरज चौधरी, विभागीय युवक अध्यक्ष सदानंद चौधरी, विभागीय युवक कार्याध्यक्ष प्रशांत सुरडकर, सरकारी कर्मचारी प्रदेश अध्यक्ष बी. एम. चौधरी, जिल्हा वकील महासंघाचे अध्यक्ष वसंतराव भोलाणे, जिल्हा महासचिव दत्तात्रेय चौधरी, जिल्हा युवक सचिव संजय नारायण चौधरी आदींसह सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी केले आहे.