चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुका भारतीय जनता पक्षाचा वतीने राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी शंखनांद आंदोलन करण्यात आले. राज्यव्यापी शंखनांद आंदोलन चोपड्यातही करण्यात आले असून यावेळी भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीने राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मंदिरे उघडण्याची मागणी केली.

राज्यातील ठाकरे सरकारने मागील पाच महिन्यांपासून
राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करून ठेवले आहेत. आता सर्व व्यवहार सुरळीत केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्याची उपासमार होत आहे, त्यांना राज्य सरकारने कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरेदेखील उघडली जात नाहीत, असे सांगत देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरू असल्याचा दाखला यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.
देव धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या देवतांना बंदिस्त करून लाखो गरिबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी श्रीकृष्ण जयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे राज्यव्यापी शंखनांद आंदोलन छेडण्यात आले. या वेळी
पंकज पाटील, राकेश पाटील, धनंजय पाटील, रविभाऊ मराठे, प्रकाश पाटील, विजय बाविस्कर, शेखर ठाकरे परेश धनगर, भरतदादा मितावली, धर्मदास पाटील, कैलास पाटील, योगेश महाजन, राकेशभाऊ, हिरालालदादा, पवनदादा उपस्थित होते.
होटल्स, बार सुद्धा चालू आहेत मग मन्दिरानीच काय पाप केल. हिन्दू चे सन आले की हिंदु लोकांच्याच आँगात येत. गणपति आले की हे करू नका, ते करू नका, दिवाली आली की फटाके वाजवू नका हे फक्त आणि फक्त हिन्दू धर्माच्या बाबतिच घड़तय, बाकी भोंगे दिवसभर, वर्षभर वाजत असतात, त्याचा कुणाला त्रास होत नाही. सामान्य माणसाला अतिशय धर्माची कालजी वाटत आहे, सामान्य माणूस अतिशय चिंतातुर आहे.