देशपांडे परिवाराकडून मिरवणूक उत्साहात; गावातील भजन मंडळांचा सक्रिय सहभाग
मारेगाव (सचिन काकडे/तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील नरसाळा या गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी व पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या पालखीचा पूर्वीपासून देशपांडे परिवाराकडे आहे. यावर्षीही सर्व देशपांडे परिवाराने एकत्र येऊन श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली.
जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावातील महिला पुरुषांनी पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच या मिरवणुकीत अनेक भजन मंडळांनीही सहभाग घेतला. याप्रसंगी देशपांडे परिवारातील डॉ. मोहनराव देशपांडे, रवीजी देशपांडे, रामदासजी देशपांडे, अनंतरावजी देशपांडे, नारायणजी देशपांडे व इतर सर्व देशपांडे परिवारासह गावकऱ्यांनी मिळून हा उत्सव आनंदाने साजरा केला.
…असा आहे गावाचा इतिहास
मारेगाव तालुक्यातील नरसाळा हे गाव तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी अठरा साधूचे गाव म्हणून या गावाची ओळख आहेत. या गावाचे गंगासागर नाटक खूप लांब गावाला गेल्यामुळे या गावांची प्रसिद्धी झाली आहे. या गावात सुंदरकाड रामायण, वारकरी भजन मंडळ, तुकडोजी भजन मंडळ, गोंडी भजन मंडळ असून दरवर्षी भागवत सप्ताह होत असल्याने हे गाव धार्मिक गाव म्हणून ओळखले जाते.