• Sat. Jul 5th, 2025

पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष दिनेश यादव यांचे अल्पशा आजाराने निधन

वाडा (अनिल पाटील) वाड्यातील अभ्यासू पत्रकार व पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष दिनेश यादव यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (दि.३सप्टें.) संध्याकाळच्या सुमारास दुःखद निधन झाले.

यादव यांना धुर्रंधर आजाराने ग्रासले होते, त्यांच्यावर मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या नंतर ते घरी परतले होते मात्र त्यांना पुन्हा त्रास उद्भवल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांनी दवा उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने शुक्रवारी सकाळी त्यांना घरी आणले मात्र या वेळी नियती समोर त्यांचे काही एक चालले नाही आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा स्वास घेतला.

दैनिक सामना वृत्तपत्रासाठी ते वाडा प्रतिनिधी म्हणून काम करत होते. त्यांनी आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांना नेहमीच न्याय देणाचा प्रयत्न केला, तर त्यांच्या परखड लिखाणाने शासकीय अधिकाऱ्यांमध्येही एक प्रकारचा धाक निर्माण झाला असला तरी सर्वसामान्यांंसह अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात त्यांचे सलोख्याचे संबंध होते. यादव यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या पालघर शाखेच्या स्थापनेसाठी मोलाचा वाटा उचलला होता. मराठी पत्रकार परिषदेचे खंदे समर्थक गेल्याने पत्रकारांमध्ये दुःखद भावना व्यक्त होत आहेत. साथीदार न्यूज डॉट कॉम परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.