चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, चोपडा येथे चातुर्मासानिमित्त हरिपाठाचा दुसऱ्या महिन्याचा पहिल्या दिवशी महिला समानता दिवस साजरा करून महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी प्रदेश तेली महासंघ संघाचे जिल्हाध्यक्ष के. डी. चौधरी सर व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सरलाबाई कालिदास चौधरी यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.
सुरुवातीला संताजी जगनाडे महाराज मूर्तीचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करून संताजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी हभप गोपीचंद महाराज, हभप तेजस महाराज, हभप चेतन महाराज आदी मान्यवरांसह बालगोपाळ मंडळी उपस्थित होती.