पुणे (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे पुणे येथे दिनांक २ ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान सरपंच क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी ( यशदा ) पुणे आयोजित राष्ट्रिय ग्राम स्वराज्य अभियान ( RGSA ) २०२१-२२ अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लातूर जिल्ह्यातील ५९ सरपंच सहभागी झाले होते. राज्यातील १०,००० नव निर्वाचित सरपंच यांना जिल्हानुसार हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत प्रशासन व्यवस्थापन, ग्रामपंचायत १ ते ३३ कामकाज नमुने, विविध शासकिय योजनांची माहिती, ग्राम सभा आयोजन, लोक सहभागातून ग्राम विकास, ग्राम पंचायत विकासाची पंच सुत्री, ग्राम पंचायत कलम ४५ शाश्वत विकास ध्येय, मानव विकास आधारित GPDP ( ग्रामपंचायत आराखडा ), पाण्याचा ताळेबंद, सरपंचपदाचे दाईत्व, E Tendering प्रक्रिया, लेखा संहिता, ग्रामपंचायत निधीसंकलन, योग प्रशिक्षण अशा विविध विषयांवर सरपंचांना मार्गदर्शन करण्यात आले. आत्मनिर्भर ग्राम अभियानविषयी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचा अनुभव खूप चांगला होता.
या दरम्यान महाएनजीओ फेडरेशन कार्याचे पुस्तक यशदाचे उपसंचालक बी एल वराळे यांना भेट म्हणून देण्यात आले. राज्यातील अनेक प्रवीण प्रशिक्षक या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रम सत्र समन्वयक म्हणून नीता मगर, श्री गंगागिरी गिरी, प्रभाकर बिरादार, विजय वरूडकर यांनी नियोजन केले होते.