चोपडा (साथीदार वृत्तसेवा) शहरात संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज, संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर येथे संत श्री सेना महाराज यांच्या प्रतिमेला जळगाव जिल्हा तेली समाजाचे अध्यक्ष श्री के .डी. चौधरी, नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री उमाकांत मधुकर निकम यांच्या शुभहस्ते पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. या वेळी के. डी. चौधरी सर यांनी संत सेना महाराज यांनी समाजातील अनिष्ट प्रथांवर प्रहार करून समाज व्यसनमुक्त करण्यासाठी आपल्या अभंगाद्वारे हरी भजनाद्वारे जनजागृती केल्याचे सांगितले. त्यांनी दिलेला मार्ग आपण सर्वांनी अंगीकारावा, असे आवाहनही चौधरी यांनी केले. श्री संताजी जगनाडे महाराज मंदिरात हरिपाठनिमित्त आरती करण्यात आली. यावेळी श्री उमाकांत मधुकर निकम व त्यांच्या धर्मपत्नी सौ कामिनीबाई निकम, श्री मुकेश देविदास चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ मायाताई चौधरी यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी नाभिक समाजाचे अध्यक्ष श्री मनोहर बन्सीलाल सोनगिरे, तालुका उपाध्यक्ष सोपान बाविस्कर, सुभाष मधुकर सैंदाणे, आधार नाना यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री उमाकांत मधुकर निकम यांची नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने तसेच श्री मुकेश देविदास चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दोघांचा श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने सपत्नीक सत्कार सत्कार करण्यात आला. विश्वस्त श्री नारायण पंडित चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.