नाभिक हितवर्धक संस्थेमार्फत साजरा करण्यात आला सोहळा
चोपडा – येथील श्री संत सेना नाभिक समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाई कोतवाल रोड न्हावीवाडा येथील समाजमंदिरात पालखी सोहळा संपन्न झाला.
यावेळी श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे सुनिल सोनगिरे व ललिता सोनगिरे यांच्या हस्ते पूजन करुन माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत निकम,तालुकाध्यक्ष रविंद्र सैंदाणे,शहराध्यक्ष मनोहर सोनगिरे,उपाध्यक्ष बापू पवार,तालुका सचिव राजेंद्र येशी,शहर सचिव बाळा निकम,राहुल निकम,सोपान बाविस्कर,आधार वसाने,सुभाष सैंदाणे,नंदलाल वाघ,जीवा सेनेचे अध्यक्ष देविदास बाविस्कर,गणेश खोंडे,धनराज पगारे,अनिल पगारे,लक्ष्मण बाविस्कर,धनंजय निकम आदिंसह समस्त समाजबांधव उपस्थित होते.