• Sat. Jul 5th, 2025

चोपड्याची कन्या डॉ. मोनिया केदारने पटकाविला ‘मिस इंडिया’चा ताज!

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) खान्देशच्या कन्येला दी इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट यांच्यावतीने आयोजित हॉटेल कोर्ट यार्ड मेरोट मुंबई एअरपोर्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या ‘मिस इंडिया 2020/21’ स्पर्धेत चोपडा येथील डॉ. मोनिया केदार हीस राष्ट्रीय पातळीवरचा मानाचा आकर्षक सौंदर्याचा ‘मिस इंडिया ग्लॅमरस इको वॉरियर्स’ प्रथम पुरस्कारचा ताज (क्राऊन) मिळाला आहे. खान्देश कन्या डॉक्टर मोनिया केदार हिने पहिल्यांदाच ‘मिस इंडिया’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

आपला डॉक्टर व्यवसाय सांभाळून संपूर्ण भारतातून टॉप पंधरा मध्ये येण्याचा मानही तिने मिळवला आहे. मिस इंडिया कार्यक्रमात भाग घेऊन उत्तुंग भरारी घेणारी डॉक्टर मोनिया केदार ही चोपडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक मुकुंद केदार व शिक्षिका उषा बाविस्कर (केदार) यांची मुलगी आहे. पुढील महिन्यात दुबई आणि न्यूयॉर्क येथे होणाऱ्या फॅशन वीक कार्यक्रमासाठी डॉक्टर मोनीयाची वर्णी लागली आहे. त्यामुळे मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाचे प्रशिक्षक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल आदिती गोवित्रीकर व मिस युनिवर्स 2001 मिस सेलिना जेटली प्रसिद्ध हॉकीपटू युवराज वाल्मिकी उपस्थित होते.

प्रश्नोत्तराच्या तासाला प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यामुळे मिस इंडिया सेलिना जेटली यांनी डॉ. मोनियाचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध टीव्ही. कलाकार आणि मॉडेल सिद्धांत सूर्यवंशी यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर्यनमॅन डॉ. स्वरूप पुराणिक आणि मिस इंटरनॅशनल वर्ल्डच्या मानकरी सुपर मॉडेल डॉ. अक्षता प्रभू यांनी विशेष परिश्रम घेतले. खान्देश कन्या डॉ. मोनिया केदार यांना साथीदार न्यूज डॉट कॉम परिवाराकडून पुढील प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.