उत्तर प्रदेशातील काशीधाम लोकार्पणानिमित्त भाजपसह आध्यात्मिक आघाडीकडून आयोजन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) दिनांक 13 डिसेंबर, सोमवार रोजी भारताचे कर्तव्यदक्ष लाडके पंतप्रधान हिंदुह्रदयसम्राट नरेंद्रजी मोदी यांचा हस्ते वाराणसी काशी येथे भव्य दिव्य असे श्री काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण होत आहे. त्यानिमित्त या पावन दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता पक्ष आध्यात्मिक आघाडी चोपडा यांचा वतीने श्री श्रेत्र हरेश्वर मंदिर, चोपडा. येथे महाआरती सोहळा आणि प्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंदिर परिसरात आकर्षक रांगोळीची सजावट करून मंदिरात पुजा करून महाआरती करण्यात आली.
आरतीचे मुख्य यजमान सुकनाथ बाबा मठाचे गादीपती श्री दिवाकर बाबा, हरेश्वर मंदिराचे पुजारी ओमकार महाराज, राजेंद्र गोसावी व नवदाम्पत्य आदी उपस्थित होते. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. या वेळी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
प्रसंगी तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जिल्हा चिटणीस सौ रंजना नेवे, अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष प्रेम घोगरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष तुषार पाठक, आध्यात्मिक आघाडी शहराध्यक्ष विजय दीक्षित, अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष संजय श्रावगी, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष दीपक लोहाणा, सरचिटणीस सुनिल सोनगिरे, उपाध्यक्ष गोपाल पाटील, वामन मगरे, अनुसूचित जमाती शहराध्यक्ष अभिषेक सूर्यवंशी, कार्यालयमंत्री मोहित भावे, बंटी लोहाणा, अनिल अग्रवाल आदींसह हरेश्वर मंदिर मित्र परिवार व मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते.