आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
चोपडा (प्रतिनिधी) चोपडा तहसील कार्यालय, ग्राहक पंचायत शाखा चोपडा आणि ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज, शुक्रवारी (दि. २४) डिसेंबर रोजी ‘ग्राहक जागृती विषयक प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे आयोजन चोपडा तहसील कार्यालयात करण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनिषाताई जीवन चौधरी पंचायत समितीच्या सभापती कल्पना दिनेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकरराव देशमुख, ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव उदयकुमार अग्निहोत्री, ग्राहक संरक्षण परिषद मंत्रालय मुंबईचे अशासकीय सदस्य तथा ग्राहक फाउंडेशनचे विकास महाजन, ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष राजेश खैरनार, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष योगेश भीमराव महाजन, ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष नारायण साळुंखे, तालुका सचिव प्रवीण देवरे, प्रबोधन मंत्री विकास जोशी, ग्राहक पंचायतीच्या महिला आघाडीच्या किरण अनिल पालीवाल तसेच ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे शहराध्यक्ष संध्याताई नरेश महाजन, तालुका उपाध्यक्ष यशवंतराव भास्करराव बोरसे, तालुका सचिव प्रदीप मनोहर पाटील आणि तालुका संघटक अमृतराव दत्तात्रय वाघ आदींसह ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष समाधान माळी, सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन २४ डिसेंबर सकाळी ११ वाजता चोपडा तहसील कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात ग्राहक संरक्षण कायद्याची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेबाबतही माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अनिल गावित यांनी दिली. सदर कार्यक्रमात ग्राहक पंचायतीचे जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाचा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार अनिल गावित प्र पुरवठा तपासणी अधिकारी देवेंद्र नेतकर आणि चोपड्याचे पुरवठा निरीक्षक शिवराज पवार यांनी केले आहे.
करोनाबाबतच्या नियमांचे पालन
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त चोपडा ग्राहक पंचायत वेळोवेळी अभिनव उपक्रम राबवत असते. यावर्षीदेखील करोनाच्या नियमांचे पालन करीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.